कोरोनाबधितांच्या रुग्णसंख्येत भारत जगात 6 व्या स्थानावर


शनिवारी एकाच दिवसात 10 हजाराहून अधिक रुग्ण सापडले, 297 रुग्णांचा एक दिवसात मृत्यू

ईगल आय मीडिया टीम

कोरोना बाधित लोक संख्येच्या बाबतीत भारताची नोंद शनिवारी रात्री जगात 6 व्या क्रमांकाचा देश म्हणून झाली. भारताने या क्रमांकावर असलेल्या इटलीला पाठीमागे टाकले असून आता भारतापुढे 5 देश आहेत. शनिवारी एक दिवसात 10 हजार 434 कोरोना पॉजीटीव्ह रुग्ण आढळून आले. पाहिल्यांदाच एका दिवसांत 10 हजाराचा आकडा ओलांडला आहे. तर शनिवारी 297 लोकांचा मृत्यू झाला आहे..
भारतात रविवारी 2 लाख 47 हजार 857 रुग्णांची नोंद झाली. त्यावेळी भारताने 2 लाख 34 हजार 801 रुग्ण असलेल्या इतलीस मागे टाकले आहे. आता भारताच्या पुढे अमेरिका 19 लाख 88 हजार 700, ब्राझील 6 लाख 76 हजार 494, रशिया 4 लाख 67 हजार 673 तर इंग्लंड 2 लाख 84 हजार 868, स्पेन 2 लाख 88 हजार 390 रुग्णसंख्या असलेले 5 देश आहेत. भारतात रुग्ण संख्या वाढीचा हाच वेग कायम राहिला तर पुढच्या 5 दिवसात भारत इंग्लंडला ही पाठीमागे टाकून 5व्या स्थानी पोहोचू शकतो.
भारतात आजवर 6 हजार 954 मृत्यू झाले आहेत. तर 1 लाख 19 हजार 293 लोक बरे होऊन घरी गेलेले आहेत. सध्या भारतात 1 लाख 21 हजार 610 पॉजीटीव्ह रुग्णावर उपचार सुरू आहेत.
तर

जगभरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 70 लाखांवर पोहोचला असून 4 लाख 2 हजार 686 जणांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण अर्थातच अमेरिकेत 19 लाख 88 हजार 700 इतके आहेत आणि सर्वाधिक मृत्यू 1 लाख 12 हजार 101 अमेरिकेतच नोंदवले गेले आहेत. जगभरात आजवर 34 लाख 28 हजार 961 रुग्ण बरे झालेले आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!