टीम : ईगल आय मीडिया
देशातील कोरोना बाधितांची संख्या ३ लाखांवर गेल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे . त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारा संवाद साधणार आहेत आणि पुढील धोरण ठरवणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ते १७ जुलै रोजी चर्चा करणार आहेत .
देशात कोरोनाचा फैलाव कमी होत नाही तर आता कोरोना बाधितांची संख्या ३ लाखांवर पोहोचली आहे . महाराष्ट्रातीळ बाधितांची संख्या १ लाख १ हजारांवर गेली आहे. देशात यापूर्वी ३ वेळा लॉक डाऊन जाहीर करूनही नियंत्रण येत नाही. ८ जून पासून नियम शिथिल करून अनलॉक सुरु केला आहे. त्यामुळे मोती राज्यातील मुख्यमंत्र्यांशी यापुढील परिस्थितीवर १६ आणि १७ जुलै रोजी चर्चा करणार आहेत