कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत
टीम : ईगल आय मीडिया
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोना बाधा झाल्यानंतर उपचारासाठी लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. सोमवारी त्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यांनी स्वतःच ट्विट करून हि माहिती दिली होती. आपली करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी स्वतःच ट्विट केले होते. त्यामुळे त्यांच्य्यावर करोनाचेही उपचार सुरुच होते. आता त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं आहे अशी माहिती मिळते आहे.
दिल्लीतल्या आर्मी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या मेंदूमध्ये एक गाठ होती, त्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीचे वृत्त कळताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या कन्या श्रर्मिष्ठा मुखर्जी यांच्याकडे चौकशी केली. ‘ लवकर बरे व्हा,; अशा शुभेच्छा दिल्या आहेत.