सलग ९ व्या दिवशी इंधन दरवाढ ; पेट्रोल ८३ तर डिझेल ७३ रु च्या पुढे

टीम : ईगल आय मीडिया
सोमवारी सलग ९ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली असून कोरोनामुळे अगोदरच हैराण झालेल्या नागरिकांना इंधन दरवाढीची होरपळ सहन करावी लागत आहे . मागील ९ दिवसांपासून इंधन दरवाढ होत असल्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोलने ८३ रुपायांची पातळी ओलांडली तर डिझेलही ७३ रुपयांच्या पार झाले आहे. विशेष म्हणजे एप्रील महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाचे मूल्य २० वर्षातील सर्वात खाली आल्यानंतरही भारतीय तेल कंपन्यांनी त्याचा लाभ ग्राहकांना मिळू दिला नाही. तर आपला नफा वाढवणे योग्य समजले. २०१७ पासून भारतीय तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या दराचा रोजचे रोज आढावा घेऊन दररोज संध्याकाळी ६ वाजता नवीन दर जाहीर करतात. लॉक डाऊन च्या काळात मात्र मागील ८२ दिवसात तेलाचा दर कमी होताच तेल कंपन्यांनी दररोज घेतला जाणारा आढावा बंद ठेऊन ग्राहकांना तेलाच्या किमतीतील घसरणीचा लाभ होणार नाही याची काळजी घेतली होती. मात्र आता तेलाच्या किमतीत वाढ सुरु होताच या कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ सुरु केली आहे. यामुळे अगोदरच कोरोनामुळे हैराण झालेल्या नागरिकांवर इंधन दरवाढीची कुऱ्हाड कोसळली आहे. मुंबईत मंगळवारी पेट्रोल ८३. ७ च्या वर गेला तर डिझेलचाहि दर वाढून प्रति लिटर ७३.२१ रुपये इतका झाला आहे. ९ दिवसांपूर्वी पेट्रोलचा दर ८६ रुपये प्रति लिटर होता मात्र आज तो ८३ पार झाल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत .

Leave a Reply

error: Content is protected !!