टीम : ईगल आय मीडिया
आम आदमी पार्टीचे खा. संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल व्यक्त केलेले भाकीत खरे ठरले आहे. खासदार संजय यांनी १७ एप्रिलच्या एका मुलाखतीमध्ये “अजून थोडा दिवस वाट पाहा. ते (पंतप्रधान मोदी) तुमच्यासमोर येतील. ते फक्त त्यांच्या लाईट्स आणि कॅमेरासाठी वाट पाहत आहेत. ते टीव्हीवर रडतील आणि देशभरातील वृत्तवाहिन्या पंतप्रधान कशापद्धतीने भावूक झाले आणि रडू लागले यासंदर्भातील बातम्या चालवतील,” असं म्हटलं होतं. ते भाकित २१ मे रोजी खरं ठरलं आहे.
आम आदमी पार्टीचे राज्य सभेचे खासदार संजय सिंह यांनी शुक्रवारी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेली भविष्यवाणी खरी ठरल्याचा दावा केलाय. या संदर्भात सिंग यांनी ट्विट करून 17 एप्रिल चा व्हीडिओ share केला आहे. त्यामध्ये सिंग यांनी, पंतप्रधान मोदी देशातील करोना परिस्थितीसंदर्भात बोलताना टीव्हीवर येऊन रडतील, असं म्हटलं होतं. शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी मोदींचा कंठ दाटून आल्याचं पहायला मिळालं. मोदींना आलेला हा गहिवर सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे.
याच मुलाखतीमधील काही भाग शेअर करत संजय यांनी मोदींवर शुक्रवारी ट्विटरवरुन निशाणा साधला. “जे १७ एप्रिलला बोललो होतो ते २१ मे ला खरं ठरलं. देशाला एक संवेदनशील आणि चांगल्या मनाचा व्यक्ती हवाय. ढोंग करणारे पंतप्रधान देशाला नकोयत ज्यांनी स्वत: निवडणुकीदरम्यान प्रचारसभा घेऊन करोनाचा प्रसार केला आणि आता रडण्याचं नाटक करत आहेत,” असा टोला संजय यांनी लगवाला आहे.
वाराणसीमधील डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदींनी शुक्रवारी संवाद साधला. त्यावेळी करोनामुळे मरण पावलेल्यांबद्दल बोलताना मोदींचा कंठ दाटून आला. देशातील आणि वाराणसीमधील परिस्थितीबद्दल मोदी बोलत होते.