सनी देओल कोरोना ग्रस्त : भाजपच्या राज्यसभा सदस्याचा कोरोनामुळे मृत्यू

टीम : ईगल आय मीडिया

भाजपचे गुरुदासपूर चे खासदार आणि चित्रपट अभिनेते सनी देओल यांना करोनाची लागण झाली आहे. तर गुजरातमधून राज्यसभेवर निवडुन गेलेले सदस्य अभय भारद्वाज यांचा मंगळवारी च कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


दरम्यान, गुजरातहून राज्यसभेवर नियुक्त केलेले खासदार अभय भारद्वाज यांचं मंगळवारी चेन्नईत करोनामुळे निधन झालं. करोनाची लागण झाल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर होती. भारद्वाज यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

हिमाचल प्रदेशचे आरोग्य सचिव यांनी मंगळवारी सनी देओल यांना करोनाची लागण झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. सनी देओल गेल्या काही महिन्यांपासून कुल्लू येथे वास्तव्यास होते, मागील आठवड्यात मुंबईत त्यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया केली होती.

त्यानंतर ते कुल्लूतील फार्म हाऊसमध्ये उपचार घेत होते. कुल्लूच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार सनी देओल आणि त्याचे मित्र मुंबईकडे रवाना होण्याची तयारी करत होते. परंतु त्यादरम्यान मंगळवारी सनी देओल यांना करोनाची लागण झाली माहिती आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी यांनी दिली.

Leave a Reply

error: Content is protected !!