12 दिवसानंतर दिल्लीची नोएडा – चिल्ला सीमा खुली

टीम : ईगल आय मीडिया

कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनामुळे गेल्या १२ दिवसांपासून बंद असलेली दिल्ली-नोएडा चिल्ला सीमा आता उघडण्यात आली आहे. चिल्ला सीमेवर धरणे आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांनी शनिवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेतली. यावेळी मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चातून सहमती झाली. यानंतर वाहतुकीसाठी मार्ग उघडण्यात आला. राजनाथ सिंहांसोबतच्या चर्चेनंतर शेतकरी नेते राजी, दिल्ली-नोएडा सीमा १२ दिवसांनी झाली खुली

शेतकऱ्यांचे ५ सदस्यांच्या टीमने संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी त्यांच्या निवासस्थानी भेटली. यावेळी झालेल्या बैठकीत कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमरही उपस्थित होते. संरक्षणमंत्र्यांसमोर १८ प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. यात मुख्य मागणी शेतकरी आयोग स्थापन करण्याची आहे. किमान आधारभूत किंमतीचा (एमएसपी) मागण्यांमध्ये उल्लेख नाही. आमच्या नेत्यांनी संरक्षणमंत्री आणि कृषीमंत्र्यांची भेट घेतली. मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन आम्हाला देण्यात आलं आहे, म्हणून आम्ही मार्ग मोकळा केला आहे, असं एका शेतकऱ्याने सांगितलं.

नोएडाहून दिल्लीला जाणाऱ्या मार्गावरील बॅरिकेड्स रात्री उशिरा हटवण्यात आले. यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरू झाली. चिल्ला सीमा बंद झाल्यामुळे वाहनचालकांना दिल्लीला जाण्यासाठी डीएनडी आणि कालिंदी कुंजमधून जावे लागले.

Leave a Reply

error: Content is protected !!