झोपडपट्टीत ट्रक घुसला, 25 जणांना चिरडले

8 जागीच ठार, 4 जण गंभीर

टीम : ईगल आय मीडिया

बरडा ( ता.सावरकुंडला,जिल्हा अमरेली, गुजरात ) येथील गावाजवळ एक ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपडपट्टीत घुसला. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून 16 लोक जखमी झाले आहेत. रात्री उशिरा हा अपघात झाला असून यापैकी 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्वांना सांवरकुंडला येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ट्रक महुवा शहराच्या दिशेने जात होता अशी स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांची मदत !
मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच ते म्हणाले, जखमींवर उपचार करण्यात कोणतीही अडचण येणार नाही याविषयी मी अधिकाऱ्यांशी बोललो असल्याचे सांगितले.

भरधाव आलेेला ट्रक 5-6 झोपडीत घुसल्याचे सांगितले जात आहे. अपघाताच्या वेळी 20-25 लोक झोपडीत झोपलेले होते. लोकांना तुडवल्यानंतर ट्रक खड्ड्यात पडला. लोकांचा आरडाओरडा ऐकून जवळच्या गावातील लोक मदतीसाठी धावले. त्यांनी रुग्णवाहिका आणि पोलिसांना माहिती दिली.

Leave a Reply

error: Content is protected !!