लोकसभा, विधानसभा निवडणुक खर्च मर्यादा वाढवली

केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाच्या विधायी विभागाने केली सुधारणा

टीम : ईगल आय मीडिया

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उमेदवाराच्या खर्चात वाढ केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यापूर्वी विधानसभा निवडणुकीसाठी 28 लाख तर लोकसभा निवडणुकीत 70 लाख रुपये खर्चाची मर्यादा एका उमेदवारास घातली होती.

केंद्र शासनाच्या विधी व न्याय मंत्रालायाअंतर्गत विधायी विभागाने यात सुधारणा करून लोकसभा 77 लाख रुपये व विधानसभा 30 लाख 80 हजार रुपये केली आहे.

त्यामुळे आता आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीकरिता उमेदवारांसाठी असलेली निवडणूक खर्चाची मर्यादा वाढविण्यात आली आहे. लोकसभेसाठी 77 लाख रुपये व विधानसभेसाठी 30 लाख 80 हजार रुपये खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.


 लोकसभा व विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसाठी सध्यस्थितीत लोकसभा 70 लाख व विधानसभा 28 लाख रुपये खर्च मर्यादा होती.  एव्हढी खर्च मर्यादा केली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!