भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा कोरोना बाधित

टीम : ईगल आय मीडिया

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. रे घरीच अयोसलेट झाले असून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत.

मागील आठवड्यात नड्डा हे पश्चिम बंगाल दौऱ्यावर गेले होते, त्यावेळी त्यांच्या वाहनांवर हल्ला झाला होता. बंगाल दौऱ्यावरून परतल्यानंतर त्यांना कोरोना सदृश्य आजाराची लक्षणे जाणवू लागली होती.

भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा याना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी रविवारी कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर नड्डा यांना होम आयसोलेट होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसेच त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत.

या संदर्भात नड्डा यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. तसेच मागील काही दिवसांत संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घ्यावी, आपली तपासणी करावी असे आवाहन नड्डा यांनी ट्वीट द्वारे केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!