बस कालव्यात कोसळली : 32 प्रवासी ठार

अजूनही काही प्रवाशी बेपत्ता

टीम : ईगल आय मीडिया

मध्यप्रदेशात ५४ प्रवाशांनी भरलेली बस कालव्यात कोसळली असून या अपघातातील मृतांची संख्या 32 झाली आहे, यामध्ये 7 महिलांचा समावेश आहे. 7 जण पोहून बाहेर निघाले असले तरी इतर प्रवाशांचा अजूनही शोध सुरू आहे.


चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु करण्यात आलं. सात प्रवाशांना वाचवण्यात आलं असून असलं तरी आतापर्यंत 32 प्रवाश्यांचे मृतदेह सापडले आहेत. यामुळे मध्यप्रदेश प्रशासन हादरले आहे.


सिध्दी जिल्ह्यात ही बस सतनाच्या दिशेने जात होती. या बसला मंगळवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. बसमध्ये एकूण ५४ प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंत सात प्रवासी पोहत बाहेर आले तर आतापर्यंत 32 मृतदेह हाती लागले आहेत.


कालवा ३० फूट खोल असल्याने पूर्ण बसच त्यात बुडाली आहे.
क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.
बसचा शोध घेताना अडथळे येत असल्याने बाणसागर धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग रोखण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंग यांनी घटनेची दखल घेतली असून प्रत्येक मिनिटाला माहिती घेत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!