टीम : ईगल आय मीडिया
उत्तराखंडमधील डेहराडून जिल्ह्यात चक्राता येथे आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. चक्रता येथे झालेल्या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर इतर 4 जण जखमी झाले आहेत. कार दरीत पडल्याने हा अपघात झाला.
गावकऱ्यांना घेऊन एक पिकअप वाहन निघाले होते. गावाच्या पहिल्या वळणावर हे वाहन दरीत कोसळले. बचाव सुरू आहे, अशी माहिती डेहराडूनचे (ग्रामीण) पोलीस अधीक्षक स्वतंत्र सिंह यांनी दिली. मालवाहतूक वाहनावर चालकाचं नियंत्रण सुटल्याने त खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाला. बचाव पथक आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
डेहराडूनच्या चक्राता तहसीलच्या बायला गावात हा भीषण अपघात झाला. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या अपघातानंतर मृतांबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. तसंच प्रशासनाला मदत आणि बचावकार्य वेगाने करण्याचे आदेश दिले आहेत. जखमींवर तातडीने उपचार करण्याची सूचनाही त्यांनी दिली आहे.
एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ६ ते ७ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. हा अपघात खोल दरीत झाला, काही सांगता येत नाही, असं चक्राताचे आमदार प्रीतम सिंह यांनी सांगितले.