पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा
टीम : ईगल आय मीडिया
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्ड च्या इयत्ता12 च्या परिक्षा तसेच राज्य सरकारसह सर्वांची मते घेण्यात आली. त्यानंतर बारावी सीबीएसई परीक्षा रद्द करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सीबीएसईच्या बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या संदर्भात आढावा बैठकी घेण्यात आली. यावेळी बारावीच्या सीबीएसई परीक्षांचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेण्यात आला आहे असे पंतप्रधानांनी यावेळी म्हटले.
आजच्या बैठकीत केंद्रीय गृह, संरक्षण, वित्त, वाणिज्य, माहिती व प्रसारण, पेट्रोलियम व महिला व बालविकास मंत्रालय आणि पंतप्रधानांचे प्रधान सचिव, शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण विभागांचे सचिव व अन्य अधिकारी उपस्थित होते.
करोनाचा शैक्षणिक कॅलेंडरवर परिणाम झाला. बोर्ड परीक्षेच्या मुद्द्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये प्रचंड चिंता निर्माण झाली होती. देशातील काही राज्ये प्रभावी मायक्रो-कंटेन्टमेंटद्वारे परिस्थिती हाताळत आहेत, तर काही राज्यांनी अजूनही लॉकडाउनचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या तणावग्रस्त परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षेस भाग घेण्यास भाग पाडता कामा नये असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. सर्वांशी सल्लामसलत केल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी अनुकूल निर्णय झाल्याचे ते म्हणाले. या विषयावर मतं व्यक्त केल्याबद्दल त्यांनी सर्व राज्यांचे आभारही मानले.
आमच्यासाठी विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आजच्या काळात अशा परीक्षा आपल्या तरुणांना धोक्यात आणण्याचे कारण बनू नयेत असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या वर्षीप्रमाणे काही विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची इच्छा असल्यास अशा परिस्थितीत जेव्हा परिस्थिती अनुकूल होईल तेव्हा सीबीएसई त्यांना असा पर्याय देणार करणार आहे.
पंतप्रधानांनी यापूर्वी २१ मे रोजी उच्चस्तरीय बैठक घेतली होती, ज्यात मंत्री व अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर केंद्रीय संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये राज्यांचे शिक्षण मंत्री उपस्थित होते. बैठकीत सीबीएसई परीक्षा आयोजित करण्याच्या विविध पर्यायांवर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून मिळालेल्या अभिप्रायांवर चर्चा करण्यात आली होती.