केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोना

ट्विट करून दिली माहिती : बिहारमध्ये निवडणूक प्रचारात आघाडीवर होत्या

टीम : ईगल आय मीडिया

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वत: इराणी यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे. जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत, अशांनी कृपया लवकरात लवकर आपली तपासणी करून घ्यावी असे आवाहनही इराणी यांनी ट्विटद्वारे केले आहे.

स्मृती इराणी या गेल्या काही दिवसांपासून बिहार मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडीवर होत्या. याच दरम्यान त्यांना कोरोनाची लग्न5 झाली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान बिहारच्या निवडणुकीत भाजपचे राज्य आणि केंद्रीय पातळीवरील अनेक नेते कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. बिहारमधील उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशील मोदी, महाराष्ट्र चे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!