महाराष्ट्रातील शिष्टमंडळास केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे आश्वासन
टीम : ईगल आय मीडिया
महाराष्ट्रातील अडचणीत सापडलेली साखर कारखानदारी वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री आणि मंत्रीगटाचे प्रमुख अमित शहा यांनी दिले.
महाराष्ट्रातल्या साखर उद्योगाला अर्थसहाय्य करण्यासंदर्भात आज सोमवारी ( दि.5 ) रोजी नवी दिल्ली येथे मंत्रीगटाचे प्रमुख अमित शहा यांच्यासोबत बैठक संपन्न झाली.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह, तसेच, आम. रणजीतसिंह मोहिते-पाटील, आम. राहुल कुल आदी उपस्थित होते. यावेळी आम. फडणवीस, आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राज्यातील साखर कारखान्याचे प्रश्न उपस्थित केले.