काँग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटेल आयसीयू मध्ये

टीम : ईगल आय मीडिया

कोरोना बाधित झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची प्रकृती बिघडली असून त्यांना गुडगाव मधील मेदंता हॉस्पिटलमध्ये अति दक्षता विभागात हलवण्यात आले आहे. पटेल यांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात करोनाची लागण झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती कुटुंबाने दिली आहे.

७१ वर्षीय अहमद पटेल यांनी १ ऑक्टोबर रोजी आपल्याला करोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली होती. अहमद पटेल यांचा मुलगा फैसल यांनी ट्विट केलं असून दिलेल्या माहितीनुसार, “अहमद पटेल यांना काही आठवड्यांपूर्वी करोनाची लागण झाली होती. सध्या त्यांना पुढील उपचारासाठी गुडगामधील मेदांता रुग्णालयातील आयसीयूत दाखल करण्यात आलं आहे”.

“सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. ते लवकर बरे व्हावेत यासाठी आपण प्रार्थना करावी अशी आमची विनंती आहे,” असंही फैसल यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!