भारतातील कोरोना बाधित 60 लाखांच्या उंबरठ्यावर

देशात 94 हजर 503 नागरिकांचा मृत्यू

टीम : ईगल आय मीडिया

भारतातीलकोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसून जगात दुसऱ्या क्रमांकाचे रुग्ण भारतात आहेत. मागील २४ तासांत देशात ८८ हजार ६०० नवे करोनाबाधित आढळले असून, १ हजार १२४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ५९ लाख ९२ हजार ५३३ वर पोहचली आहे.

देशभरातील एकूण ५९ लाख ९२ हजार ५३३ करनाबाधितांमध्ये ९ लाख ५६ हजार ४०२ अॅक्टिव्ह रुग्ण, डिसचार्ज मिळालेले ४९ लाख ४१ हजार ६२८ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ९४ हजार ५०३ जणांच्या संख्येचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयच्या हवाल्याने एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.

याबरोबर देशात २६ सप्टेंबरपर्यंत ६,१२,५७,८३६ नमूने तपासण्यात आले असून, यातील ९ लाख ८७ हजार ८६१ नमून्यांची काल तपासणी झाली आहे. आयसीएमआरकडून ही माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!