देशात कोरोनाची पुन्हा उसळी

24 तासात 44 हजार 500 नवीन रुग्ण : 524 मृत्यू

टीम : ईगल आय मीडिया
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीप्रमाणे देशात गेल्या २४ तासांत ४४ हजार ४८९ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. नवीन रुग्णसंख्येची भर पडल्यानं देशातील करोनाची एकूण रुग्णसंख्या ९२ लाख ६६ हजार ७०६ इतकी झाली आहे. मागील २४ तासांत ५२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या वाढून १ लाख ३५ हजार २२३ वर पोहोचली आहे.

देशातील करोना थैमान कायम आहे. दिवाळी आधी काही प्रमाणात रुग्णसंख्या कमी झाल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र, करोनानं पुन्हा एकदा हातपाय पसरवण्यास सुरूवात केली असून, दिवसागणिक देशातील रुग्णसंख्येचा आकडा वेगानं वाढू लागला आहे.

मृतांची संख्या वाढली असून, गेल्या २४ तासांत देशात ५०० पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात ४ लाख ५२ हजार, ३४४ रुग्ण उपचार घेत आहेत. तर ८६ लाख ७९ हजार १३८ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. मागील २४ तासांमध्ये ३६ हजार रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे

करोनाबाधितांच्या संख्येचा वेग वाढल्यानं केंद्र सरकारनं राज्यांना तातडीनं पावलं उचलण्याचे निर्देश दिले आहेत. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असताना गेल्या २४ तासांत मोठ्या संख्येनं नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!