ई पास ची गरज नाही : केंद्रीय गृह सचिवांची राज्यांना सूचना
टीम : ईगल आय मीडिया
गेल्या 5 महिन्यापासून देशात आणि राज्यांतर्गत प्रवास, माल वाहतुकीवर असलेले निर्बंध आजपासून हटवण्यात आले आहेत, केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्यांच्या सचिवांना आज ( शनिवारी ) या संदर्भात सूचना केल्या आहेत.
केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, अन लॉक 3 नुसार 22 जुलै रोजीच्या आदेशात अशा प्रकारचे निर्बंध लावण्याचे आदेश नाहीत. तरीही काही राज्यात असे निर्बंध असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आर्थिक घडामोडी, पुरवठा साखळी, नोकरी, व्यवसाय यावर त्याचा विपरीत परिणाम नागरिकांच्या हालचाली आणि व्यापार विषयक गोष्टींवर होत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे निर्बंध हटवण्यात यावेत अशा सूचना राज्यांना करण्यात आल्या आहेत.
नुसार लावण्यात आलेले प्रवास आणि मालवाहतूक निर्बंध मागे घेण्यात यावेत. यापुढे आंतरराज्य आणि राज्यांतर्गत प्रवास आणि माल वाहतूक करण्यासाठी कोणत्याही पास अथवा ई पास ची आवश्यकता नाही. कुठे अशा प्रकारचे निर्बंध असतील तर ते आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे उल्लंघन असेल असेही या पत्रात नमूद केले आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या सचिवांना शनिवारी ( 22 ऑगस्ट ) पत्र लिहून कळवले आहे.
दरम्यान, राज्यात हे आदेश लागू करण्यासाठी राज्य सरकारने आदेश काढणे आवश्यक आहे.