इंग्लंडहुन विमानाने अमृतसरला आलेले 8 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

क्रु मेम्बरसह 263 प्रवाशी अमृतसर मध्ये क्वारांटाईन केले

टीम : ईगल आय मीडिया

लंडनच्या हिथ्रो विमानतळावर कोविड तपासणी करून अमृतसर येथे उतरलेल्या 263 विमान प्रवाश्यांची कोरोना तपासणी केली असता 8 जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे इंग्लंडमध्ये या सर्व प्रवाश्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती.

इंग्लंडमध्ये कोरोनाच्या नवीन विषाणू मुळे खळबळ उडाली असून भारताने दक्षता म्हणून 31 डिसेंबर पर्यंत सर्व परदेशी विमान वाहतूक बंद केली आहे. हा आदेश निघण्यापूर्वी सोमवारी रात्री उशिरा लंडन मधून टेक ऑफ घेतलेल्या विमानात एअर इंडियाच्या विमान कर्मचार्यांसह 263 प्रवासी होते.

मंगळवारी पहाटे अमृतसर येथील श्री गुरू रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर या सर्वांची कोरोना चाचणी घेण्यात आली.या प्रवाश्यानी लंडनमध्ये आपली तपासणी केली असल्याने अमृतसर मध्ये तपासणी करण्यास नकार देत विरोध दर्शवला होता.

मात्र विमानात प्रशासनाने सर्वांना तपासणी करावीच लागेल असे ठणकावल्यानंतर हे प्रवाशी rtpcr तपासणीसाठी तयार झाले. 15 तासांनी यांचा चाचणी अहवाल आला आणि त्यातील 8 जण पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये 2 महिला आणि 6 पुरुष यांचा समावेश आहे. या सर्वांना अमृतसरमध्ये क्वारांटाईन करण्यात आले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!