डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र
टीम : ईगल आय मिडीया
भ्रामक प्रचार हा कूटनीतीचा आणि मजबूत नेतृत्वाचा पर्याय असू शकत नाही. काही लोकांकडून चुकीच्या गोष्टी पुढे आणल्या जात आहेत. यामुळे सत्य लपले जाणार नाही. अशा शब्दात सरकारच्या परराष्ट्र धोरणावर काँग्रेसनं टीका केली आहे.
१६ व १७ जून रोजी गलवान भागात झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीले आहे. आज आपण एका नाजूक परिस्थितीतून वाटचाल करीत आहोत. सरकारने घेतलेले निर्णय, उचललेली पावले ही पुढची परराष्ट्र धोरणाची दिशा ठरणार आहेत. पंतप्रधानांकडून करण्यात येणाऱ्या घोषणा तसेच वापरण्यात येणारे शब्द याचा परिणाम हा सीमावर्ती भाग तसेच सुरक्षा यंत्रणा यावर पडत असतो. याबाबत त्यांनी संवेदनशील असायला हवे अशी अपेक्षा व्यक्त करून मनमोहनसिंग पुढे म्हणतात की,
एप्रिल २०२० पासून चीनने गलवान भागात घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. कुणाच्याही दबावापुढे देश झुकणार नाही. शत्रु राष्ट्राच्या धोकाधडी च्या कृत्यांना बळ मिळेल अशी विधाने करू नयेत असाही सल्ला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिला आहे. निर्माण झालेल्या परिस्थितीला धैर्याने सामोरे जाण्याचे तसेच वीर जवान नि दिलेल्या बलिदान व्यर्थ जाणार नाही याची काळजी घ्यावी असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.