प्रणव मुखर्जी यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे.
टीम : ईगल आय मीडिया
देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः मुखर्जी यांनीच ट्विट करून ही माहिती दिली आहे. प्रणव मुखर्जी हे रुग्णालयात गेले असता करोना चाचणी केली. यावेळी त्यांना करोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं. प्रणव मुखर्जी यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांना विलगीकरणात राहण्याचं तसंच करोना चाचणी करण्याची विनंती केली आहे.
प्रणव मुखर्जी यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ” ते एका दुसऱ्या कारणासाठी रुग्णालयात गेलो होतो. यावेळी त्यांना करोनाची लागण झाली असल्याचं आढळलं. गेल्या आठवड्याभरात संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवावं तसंच आपली कोविड चाचणी करावी अशी विनंतीही मुखर्जी यांनी ट्विट मध्ये केली आहे.