माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोमात


प्रकृती चिंताजनक : अफवावर विश्वास नको

टीम : ईगल आय मीडिया

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक असून ते कोमात गेले आहेत. लष्कराच्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या प्रकृतीत अद्याप काहीही सुधारणा झालेली नाही. त्यांना व्हेंटिलेटरवरच ठेवण्यात आलं आहे.
10 ऑगस्ट रोजी प्रणव मुखर्जी याना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यापूर्वी त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह अली होती.
त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा नसल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. एएनआयने या संदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. १० ऑगस्टपासून प्रणव मुखर्जी यांची प्रकृती बिघडली आहे. १० तारखेच्या एक दिवस आधीच त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. १० ऑगस्ट रोजी त्यांच्या मेंदूत असलेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत काहीही सुधारणा झालेली नाही. आता ते कोमात गेले आहेत असं आर्मी रुग्णालयाने स्पष्ट केलं आहे.
त्यांच्या प्रकृती बाबत पसरलेल्या अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन त्यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!