माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कालवश

84 व्या वर्षी 21 दिवसांचा हॉस्पिटलमधील संघर्ष संपला

टीम : ईगल आय मीडिया

अगोदर कोरोना पॉझिटिव्ह, आणि नंतर मेंदूतील गाठीवर करावी लागलेली शस्त्रक्रिया यामुळे मागील 21 दिवस रुग्णालयात जिवन मृत्यूशी सुरू असलेला संघर्ष संपला असून आज ( 31 औगस्ट).माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अखेरचा निरोप घेतला.

प्रणव मुखर्जी यांच्यावर आर्मी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. सोमवारी रुग्णालयाने मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध करत फुफ्फुसांच्या संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये गेल्याची माहिती दिली होती. त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. पण अखेर उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

१० ऑगस्टपासून प्रणव मुखर्जी यांची प्रकृती बिघडली होती. त्या दिवशी त्यांच्या मेंदूत असलेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान एक दिवस आधी त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. रुग्णालयात दाखल झाल्यापासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. त्यानंतर ते कोमात गेले आहेत असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं होतं.

पश्चिम बंगालमध्ये स्वातंत्र्यसैनिक आई वडिलांच्या पोटी जन्म घेतलेल्या 84 वर्षीय मुखर्जी यांनी लोकसभेत अनेकवेळा प्रतिनिधित्व केले.काँग्रेस मंत्रिमंडळात त्यांनी परराष्ट्र, अर्थ, संरक्षण यासह अनेक महत्वाची पदे भूषवली. 2012 ते 2017 या दरम्यान ते देशाचे राष्ट्रपती होते. सलग 34 वर्षे ते लोकसभेत निवडून आले होते.
प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर एका आदर्श आणि निस्पृह राजकीय कारकिर्दीची अखेर झाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!