कांग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा आरोप
टीम : ईगल आय मिडीया
भारतात फेसबुक आणि व्हाट्सअप भाजपाच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध ‘ द वाॅल स्ट्रीट जर्नल ‘ मध्ये प्रसिद्ध झालेला लेख ट्वि्ट करून गांधी यांनी भाजप व आरएसएस वर निशाणा साधला आहे.
अलीकडेच बेंगलोर येथील एका भाजपा नेत्याने मुस्लिम विरोधी केलेले ट्विट ‘ हेेेट स्पीच ‘ अंतर्गत फेसबुककडून हटविण्यात आले नाही. भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी देखील मुस्लिमांसंदर्भात ट्विट केलेले होते. त्याबद्दल ही काही करण्यात आले नाही.
फेसबुक मधील १२३ अधिकारी यांनी यासंदर्भात कोणतीही कार्यवाही केलेली नाही. भाजपाचा दबाव असल्यामुळे यासंदर्भातील कारवाई केली जात नसल्याचा आरोप गांधी यांनी केला आहे.
फेसबुक ने अलिकडेच आक्षेपार्ह मजकूर हटविण्यासंदर्भातील नियमावली तयार केली आहे, असे असतानाही भाजपाच्या नेत्यांकडून करण्यात आलेल्या पोस्ट या मुस्लिम विरोधी, समाजात द्वेष पसरवणाऱ्या असतानाही त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे समोर येत आहे. भारतात फेसबुक हे सत्ताधारी भाजपाच्या दबावात काम करीत आहे. असेही गांधी यांनी म्हटले आहे.