देशभरात भारत बंद ला मोठा प्रतिसाद

दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, केरळ, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, झारखंड, ओरिसा राज्यात सर्वाधिक परिणाम

टीम : ईगल आय मीडिया

कृषी कायदे मागे घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी आज देशातील शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. बंद पाळणाऱ्या राज्यांमध्ये पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगण, झारखंड आणि दिल्लीचा समावेश आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे मुख्य केंद्र बनलेल्या दिल्लीत या ‘भारत बंद’ आंदोलनाचा सर्वात मोठा परिणाम जाणवू शकतो. राजस्थानात सत्तारुढ काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे समर्थन केले आहे. राज्यातील सर्वात मोठ्या महामार्गावर बंदचा परिणाम पाहायला मिळतो आहे.

महाराष्ट्रात सत्तारुढ स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतरही संघटना तसेच शिवसेना, कांग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे समर्थन केले आहे. त्यामुळे राज्यात भारत बंद चा मोठा परिणाम दिसून येतो. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये कार्यालये बंद राहणार आहेत.कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहिल्याने शेत मालाची आवक जावक बंद आहे.

अण्णा हजारे यांचीही आंदोलनात उडी घेतली आहे. केंद्राच्या कृषी कायद्याला जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही विरोध केला असून त्यांनी सुद्धा भारत बंद ला पाठिंबा दर्शवला आहे.

राज्यात मराठवाडा आणि विदर्भातील ग्रामीण भागांमध्ये देखील बंदचा परिणाम दिसून येतोय. नाशिक, सोलापूर, पुणे, सांगली, कोल्हापूर, लातूर, अमरावती, अहमदनगर या जिल्ह्यात सर्व पक्षीय निदर्शने केली जात आहेत. अनेक ठिकाणी रेल्वे वाहतूक रोखून धरण्यात अली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!