शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्या : तरच सरकार सोबत चर्चा

शेतकरी संघटना आक्रमक : इंटरनेट सुरू करण्याची ही मागणी

टीम : ईगल आय मीडिया

केंद्रानं लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आता शेतकरी आंदोलन आता तापलंय. सद्यस्थितीत सरकारशी चर्चा करणं शक्य नाही, असं शेतकरी संघटनांनी स्पष्ट केलंय. जेव्हापर्यंत निर्दोष शेतकऱ्यांवर आणि शेतकरी नेत्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेतले जात नाही, या भागातील इंटरनेट सेवा पुन्हा सुरळीत होत नाही तेव्हापर्यंत चर्चेची शक्यताच शेतकरी नेत्यांनी फेटाळून लावलीय.

दिल्ली सरकारकडून आम्हाला ११५ लोकांची एक यादी मिळाली आहे. परंतु, अद्यापही आमचे सहा लोक बेपत्ता आहेत, असंही शेतकऱ्यांनी स्पष्ट केलंय. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी लाल किल्ला आणि दिल्लीच्या इतर परिसरात उसळलेल्या हिंसाचारानंतर अनेक शेतकरी बेपत्ता आहेत.

आम्ही लोकांसोबत हेल्पलाईन क्रमांक शेअर केलेला आहे. लोक फोन करून बेपत्ता असलेल्या आपल्या नातेवाईकांची माहिती आमच्यापर्यंत पोहचवत आहेत, अशा परिस्थितीत सरकारसोबत चर्चा होणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत शेतकरी नेत्यांनी सरकारला सुनावलंय.

शेतकऱ्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर लोखंडी खिळ्यांची भिंतच उभी करण्यात आली आहे. तारांचा वापर करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत चर्चा होणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

शेतकऱ्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर लोखंडी खिळ्यांची भिंतच उभी करण्यात आली आहे. तारांचा वापर करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत चर्चा होणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

दुसरीकडे, आज विरोधी पक्षाचे १५ खासदार गाझीपूर सीमेवर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी पोहचले होते. परंतु, पोलिसांनी मात्र खासदारांना बॅरिकडेस घालून रोखलं. अनेकदा विनंती करूनही शेतकऱ्यांची परवानगी न मिळाल्यानं या खासदारांना आंदोलनकर्त्यांची भेट न घेताच माघारी परतावं लागलंय.

Leave a Reply

error: Content is protected !!