15 जणांचा मृत्यू : 3 जण जखमी
टीम : ईगल आय मीडिया
सुरतमध्ये मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्याफुटपाथवर झोपलेल्या 18 मजुरांना टिपरने चिरडले. या भीषण अपघातामध्ये १५ मजुरांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास सुरत जिल्ह्यातील कोसांम्बा येथे अपघात झाला असून 13 जनांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार मरण पावलेले सर्वजण हे राजस्थान मधून पोटासाठी आलेले मजूर आहेत.
दरम्यान, या १३ जणांबरोबरच त्यांच्या इतर दोन सहकाऱ्यांचाही नंतर मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या अपघातामध्ये सहाजण जखमी झाले असून त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयामध्ये उपाचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
हा अपघात झाला तेव्हा घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार एका ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट रस्त्याच्याकडेला झोपलेल्या मजुरांच्या अंगावर गेला. पोलिसांनी या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. रात्री या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस अधिकारी आणि मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून मदतकार्य सुरु करण्यात आले.
सूरतमधील पलोड गावाच्या जवळ असणाऱ्या किम मांडवी रस्त्यावर हा अपघात झाला आहे. किम हाकर मार्गाजवळ एका ट्रकचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. रात्री बारानंतर झालेल्या या अपघातामध्ये ट्रक एका ऊसाच्या ट्रॅक्टरला धडकला.
मांडवीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅक्टरला ट्रकने जोरदार धडक दिल्यानंतर ट्रॅकवरील नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला. या अपघातामध्ये ट्रकचा चालक आणि क्लिनरही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरही उपचार सुरु आहेत.
वाहन चालकवर कठोर कारवाई होने आवश्यक