प्रशिक्षकाने केली दोन सहकाऱ्यांसह 2 महिला कुस्तीगीरांची हत्या

टीम : ईगल आय मीडिया
महिला कुस्ती प्रशिक्षकाने कुस्ती आखाड्यातच केलेल्या गोळीबारात 2 कुस्ती प्रशिक्षक आणि 2 महिला खेळदुसह 5 जण ठार तर 2 जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना रोहतक ( हरियाणा ) येथे घडली आहे.

सुखविंदर असे या घटनेतील आरोपी प्रशिक्षकाचे नाव आहे. सुखविंदर याच्याबाबत महिला खेळाडूने तक्रार केल्यानंतर त्याला प्रशिक्षक म्हणून आखाड्यात येण्यास मनाई केली होती. त्यामुळे चिडून सुखविंदर याने हे कृत्य केल्याचे सांगितले जाते. या घटनेचा पोलीस तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास जाट कॉलेजच्या मेहरसिंह आखाड्यात हा गोळीबार झाला आहे, यामध्ये दोन प्रशिक्षक, 2 कुस्तीगीर यांच्यासह 7 लोकांना गोळ्या लागल्या आहेत आणि या गोळीबारात 5 जण ठार झाले आहेत तर 2 जण जखमी झाले आहेत.
प्रदीप मलिक, साक्षी आणि पूजा अशी 3 मयतांची नावे समजली आहेत. मयतांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेले आहे तर 2 जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी अद्यापही कुणाला अटक झालेली नाही. रोहतक मध्ये तणाव निर्माण झाला असून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
अरेरे, अत्यंत दुर्दैवी घटना..