गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी कोरोना पॉझिटिव्ह

टीम : ईगल आय मीडिया

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना कारोनाची लागण झाली आहे. बडोद्यातील निवडणुकीच्या एका प्रचारसभेत भाषण देताना रुपानी यांना भोवळ आणि ते मंचावर कोसळले होते. यानंतर त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली असता ते पॉझिटिव्ह आढळले. रुपाणी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी रुपाणी रविवारी बडोद्याच्या निजामपुरा येथे पोहोचले. येथील सभेत ते रुपानी भोवळ येऊन पडले. यानंतर त्यांची सभा रद्द करण्यात आली. स्टेजवरच डॉक्टरांनी रुपानी यांना प्रथमोपचार दिले.

मुख्यमंत्री रूपानी अनेक दिवसांपासून जाहीर सभा घेत होते, नागरिकांना भेटत होते. महापालिका निवडणुकांचा प्रचार करत होते, त्यांची प्रकृती खालावली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे ते करोना पॉझिटिव्ह आढळून आले. सुमारे आठवडाभर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केला जाईल, असं गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी सांगितलं.

Leave a Reply

error: Content is protected !!