केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांची उत्तर प्रदेशच्या राज्यपालांकडे मागणी
टीम : ईगल आय मीडिया
हाथरस मध्ये दलित युवतीवर अमानुष अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा करावी तसेच याप्रकरणात बेजबाबदारपणे काम करणाऱ्या पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकऱ्यांसह हाथरसच्या जिल्हा अधिकाऱ्यास सेवेतून निलंबित करावे या मागणीसाठी आज उत्तर प्रदेशच्या राज्यपाल माननीय आनंदीबेन पटेल यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी भेट घेतली.
हाथरस मधील बळीत मुलीच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार पोलिसांनी करण्यात घाई गडबड करून मोठी चूक केली आहे. दलित अत्याचरांच्या प्रश्नांवर कोणीही राजकारण खेळू नये. दलित अत्याचार रोखण्यासाठी सवर्ण वर्गाकडून दलितांशी समतेने आपलेपणाने वागले पाहिजे. दलित सवर्ण यांच्यातील सामाजिक दरी मिटली पाहिजे असे ना. रामदास आठवले म्हणाले.
उत्तर प्रदेश सरकार च्या समाज कल्याण विभागातर्फे बळी गेलेल्या दलित मुलीच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये सांत्वनपर देण्यात आले आहे. तसेच उत्तर प्रदेश सरकार तर्फे हाथरस पीडित दलित मुलीच्या परिवाराला चांगले घर; 25 लाख रुपये सांत्वनपर निधी; घरातील एकास शासकीय नोकरी देऊन या कुटुंबाला मदत देण्यात येणार आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर फाशीची शिक्षा करण्यात येईल तसेच या प्रकरणातील बेजबाबदार अधिकऱ्यांना निलंबित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे.असे ना. रामदास आठवले म्हणाले.