टीम : ईगल आय मीडिया
देशात गेल्या चोवीस तासांमध्ये करोना रुग्णांची संख्या ६९ हजार ६५२ इतकी विक्रमी वाढली.दिवसभरात ९७७ रुग्णांचा मृत्यू झाला. देशभरात रुग्णसंख्या २८ लाख ३६ हजार ९२६ वर पोहोचली असून, करोनाबळींची एकूण संख्या ५३ हजार ८६६ झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीचा नवा उच्चांक गुरुवारी नोंदविण्यात आला. गेल्या २४ तासांत १४,४९२ नवे रुग्ण आढळले. दिवसभरात राज्यात ३२६ जणांचा मृत्यू झाला.
देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून करोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. आजवर सुमारे २१ लाख रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये देशात ५८ हजार ७९४ रुग्ण करोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४ टक्के आहे. देशात ६ लाख ८६ हजार ३९५ रुग्ण उपचाराधीन आहेत. मृत्युदर १.८९ टक्के आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये ९ लाख १८ हजार ४७० इतक्या आत्तापर्यंतच्या सर्वाधिक चाचण्या घेण्यात आल्या.
राज्यात गुरुवारी 24 तासात १४,४९२ रुग्ण आढळले. राज्यातील करोनाबाधितांची एकू ण संख्या ६ लाख ४३ हजार झाली असून, १ लाख ६२ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. दिवसभरात मुंबई १,२७५, नागपूर ९२४, नवी मुंबई ४९२, नाशिक शहर ७४५, पुणे शहर १६८२, पिंपरी-चिंचवड १०००, जळगाव ५१५, उस्मनाबाद २६४, कोल्हापूर जिल्हा ५५० रुग्ण आढळले आहेत.