भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 36 लाखांवर

सोमवारी 24 तासांत विक्रमी 78512 नवे रुग्ण

राज्यात मात्र दिलासा : 11 हजार 500 सापडले 11 हजार 58 बरे होऊन गेले

टीम : ईगल आय मीडिया

भारतात COVID-19 रुग्णांची संख्या 36 लाखांहुन अधिक झाली आहे. सोमवारी 24 तासांत देशात तब्बल 78,512 नवे रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (Health Ministry of India) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, भारतात (India) मागील 24 तासांत 78,512 रुग्ण आढळले असून 971 रुग्ण मरण पावले आहेत.

यामुळे देशात कोरोना बाधितांची संख्या 36 लाखांच्या वर गेली असून एकूण संख्या 36 लाख 21 हजार 246 वर पोहोचली आहे. तर देशातील मृतांचा एकूण आकडा 64,469 वर पोहोचला आहे.
तर दुसरीकडे दिलासादायक गोष्ट म्हणजे देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले असून रिकव्हरी रेट (Recovery Rate) सुधारला आहे.
आतापर्यंत देशात 27,74,802 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य घडीला देशात 7,81,975 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्रात दिलासा !
रुग्ण संख्या घटली

गेल्या काही दिवसांपासून 15 हजारांच्या वर दररोज रुग्ण सापडत होते. मात्र सोमवारी काहीसा दिलासा मिळाला आहे. सोमवारी
राज्यात 11852 कोरोना बाधीत रुग्ण सापडले आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरवर दिली आहे. त्याचबरोबर सोमवारी राज्यात एकूण 11 हजार 158 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 573559 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत तसेच
सध्या राज्यात एकूण 1 लाख 94 हजार 56 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 72.37% झाले आहे अशीही माहिती ना. टोपे यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!