टीम : ईगल आय मीडिया
भारतात कोरोनाचा कहर कायम असून देशातील कोरोना बाधितांची संख्या ४ लाखांच्या उंबरठ्यावर ( ३ लाख ९७ हजार २३ ) येऊन ठेपली आहे. भारतात मागील २४ तासात १४ हजार ५१६ नवीन रुग्ण सापडले आहेत तर ३७५ रुग्णांची जीवन यात्रा कोरोनाने संपवली आहे. देशात आजवर कोरोनामुळे १३ हजार २७७ नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. त्याचबरोबर तब्बल २ लाख २८ हजार १८१ रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत.
कोरोनाचा पाहिला रुग्ण ३० जानेवारी रोजी सापडला होता. त्यानंतर भारतात १ लाख रुग्णसंख्या होण्यासाठी ( १८ मे ) १०९ दिवस लागले होते. त्यानंतर मात्र भारतात कोरोनाचा प्रसार वेगाने सुरु झाला. १ ते २ लाख हा टप्पा केवळ १५ दिवसांत ( २ जून) २ ते ३ लाख रुग्ण संख्येचा गंभीर टप्पा फक्त ११ दिवसांत ( १३ जुन ) आणि ३ ते ४ लाख हा टप्पा जेमतेम ७ दिवसात ( २० जून ) पार केला आहे. २० जून च्या रात्री उशिरा भारतात कोरोनारुग्णांची संख्या ४ लाख ११ हजार ७२७ एवढे रुग्ण असून सध्या जागतिक पातळीवर सर्वाधिक कोरोना बाधितांच्या यादीत भारताचा ४ था क्रमांकावर आहे. तिसऱ्या नंबरवरील रशियामध्ये ५ लाख ७६ हजार रुग्ण आहेत आणि पहिल्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेत २२लाख ९८ हजारांवर रुग्णसंख्या झाली आहे. तर अमेरिकेत १ लाख २१ हजार ४२४ एवढे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. तर ८ हजार ९४४ रुग्ण अत्यवस्थ अवस्थेत उपचार घेत आहेत.
भारतातकोरोनाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने ८२ दिवसांचा तीनवेळा लॉक डाऊन जाहीर केला तरीही कोरोनाचा प्रसार सुरूच आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश पाठोपाठ आता कोरोनाने मुंबई पाठोपाठ चेन्नई, अहमदाबाद, दिल्ली हि शहरे हॉटस्पॉट बनवली आहेत.
सद्य देशाचे कोरोना बरा होण्याचे प्रमाण ५५.४ टक्के असून सरासरी मृत्यूचे प्रमाण ३.२ टक्के इतके कमी आहे.
कोरोना रुग्णांची लाखांची उड्डाणे आणि लागलेले दिवस खालीलप्रमाणे
१०९ दिवसांत १ लाख
१५ दिवसांत २ लाख
११ दिवसांत ३ लाख
७ दिवसांत ४ लाख टप्पा पार केला