भारतात 9 दिवसांत 5 लाख कोरोनाग्रस्त वाढले

लवकरच ब्राझीलला मागे टाकून 2 ऱ्या क्रमांकावर जाण्याची शक्यता

टीम : ईगल आय मीडिया

भारतात कोरोना रुग्णाची संख्या वाढ आता अतिशय वेगवान झाली असून 15 ते 20 लाख हा रुग्ण वाढीचा 5 लाखांचा टप्पा देशाने केवळ 9 दिवसांत पार केला आहे. याच वेगाने वाढ होत राहिल्यास या 24 ऑगस्ट पर्यंत देश ब्राझीलला मागे टाकून जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचू शकतो.


दरम्यान, देशभरात मागील 24 तासांमध्ये ६२ हजार ५३८ रुग्णांची भर पडली असून एकूण करोना रुग्णसंख्या २० लाख २७ हजार ७४ वर पोहोचली आहे. रुग्णसंख्येत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे तर, अमेरिकेत ४७.२८ लाख, ब्राझीलमध्ये २८.०१ लाख एवढे रुग्ण आहेत.
गेल्या 9 दिवसापासून
भारतात दररोज ५० हजारांहून अधिक होत रुग्ण वाढ होत असल्याने देशातील रुग्णसंख्या लवकरच ब्राझीललाही मागे टाकू शकेल. १५ लाख ते २० लाख अशी पाच लाखांची वाढ केवळ नऊ दिवसांमध्ये झाली आहे.
पहिले १ लाख रुग्ण ७८ दिवसांमध्ये नोंदवले गेले. त्यानंतर ५ लाखांचा टप्पा 39 दिवसनी, १० लाखांचा टप्पा 20 दिवसांनी, १५ लाखांचा टप्पा 12 दिवसांनी तर २० लाखांचा टप्पा त्यानंतर करवत 9 दिवसांत पार केला आहे.

मागील चोवीस तासांमध्ये देशात ८८६ मृत्यू झाले असून एकूण मृतांचा आकडा ४१ हजार ५८५ वर पोहोचला आहे. समाधानकारक गोष्ट म्हणजे मृत्युदर २.०५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. जुलै महिन्याच्या पूर्वार्धात देशातील मृत्युदर ३ टक्क्यांपेक्षा जास्त होता. करोनामुक्त रुग्णांची संख्या उपचाराधीन रुग्णांपेक्षा ७.७ लाखांनी जास्त आहे. एकूण १३ लाख ७८ हजार १०५ रुग्ण करोनामुक्त झाले असून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६८ टक्क्यांवर गेले आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये ४९ हजार ७६९ रुग्ण बरे झाले. ६ लाख ७ हजार ३८४ रुग्णवर उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!