जशास तसे उत्तर देण्यास भारत सक्षम : पंतप्रधान मोदी, जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही नाही


टीम : ईगल आय मीडिया
भारत -चीन सीमेवर भारतीय जवान प्रतिकार करताना मारले गेले आहेत, त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. भारत शांतताप्रिय देश आहे मात्र जशास तसे उत्तर देण्यास भारत सक्षम आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी केले . कोरोना विषाणू विषाणू, लॉक डाऊनसंदर्भात देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आज मोदीनी ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत सुरुवातीला मोदींनी भारत-चीन सीमा वादासंदर्भात मुख्यमंत्र्यांना माहिती दिली आणि जवानांना श्रद्धांजली वाहिली.
भारताने नेहमीच शेजारी देशांसोबत सहकार्याची भावना ठेवली आहे. आपण कधीच कुणाला उचकवत नाही.मात्र वेळ आल्यानंतर त्यांना धडा शिकवतो.
यापूर्वीही आपण आपलं सामर्थ्य दाखवून दिलं आहे. आम्हाला शांती हवी आहे. पण जशास तसे उत्तर देण्यासही भारत सक्षम आहे असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

Leave a Reply

error: Content is protected !!