मुलगीसुद्धा पॉझिटिव्ह : दोघेही एकाच रुग्णालयात दाखल
टीम : ईगल आय मीडिया
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर आणखी एक मोठी बातमी आहे कि, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः येडियुरप्पा यांनी ट्विट करून हि माहिती दिली आहे. त्यांची मुलगी सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह असून दोघेही बंगलोर च्या मणिपाल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेले आहेत. येडियुरप्पा यांच्या मंत्रिमडळातील ३ मंत्र्यांना यापूर्वीच कोरोना लागण झाली आहे.
येडियुरप्पा यांनी ट्विट करून आपला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून माझ्या संपर्कात कुणीही येऊ नये, जे आपल्या संपर्कात आले होते त्यांनी क्वारंटाईन व्हावे आणि आपली तपासणी करून घ्यावी असेही आवाहन येडियुरप्पा यांनी केले आहे.