काश्मीरमध्ये भाजपचे 3 कार्यकर्ते अतिरेकी हल्ल्यात ठार

टिम : ईगल आय मीडिया

जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी 3 भाजपा कार्यकर्त्यांची गोळ्या घालून हत्या केली आहे.अतिरेक्यांनी गुरुवारी रात्री कारमधून जात असलेल्या या कार्यकर्तेवर गोळीबार केला. हेे तीनही कार्यकर्ते ठार झाले आहेत. फिदा हुसैन यातू, उमेर रशिद बेग आणि उमेर रमझान हजीम अशी या तिघांची नावं आहेत.

गोळीबार झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे असंही पोलिसांनी सांगितलं आहे. तसंच पोलिसांनी या भागांमध्ये शोध मोहीमही सुरु केली आहे. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

गुरुवारी रात्री आठ वाजता भाजपच्या या तीन नेत्यांवर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती कुलगाम पोलिसांना मिळाली. यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दहशतवाद्यांनी भाजपच्या तीन कार्यकर्त्यांवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. या हल्ल्यात फिदा हुसेन, उमर रशीद बेग आणि अबडर रशीद बेग हे तिघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

दहशतवाद्यांचा शोध सुरु केला आहे. जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये ही घटना घडली आहे. या गोळीबारात जखमी झालेल्या फिदा हुसैन यातू, उमेर रशिद बेग आणि उमेर रमझान हजम या तिघांनाही रुग्णालयात नेण्यात आलं. हे तिघेही भाजपाचे कार्यकर्ते आहेत. रुग्णालयात आणण्यापूर्वीच या तिघांचा मृत्यू झाला.

Leave a Reply

error: Content is protected !!