बलात्काराचा आरोप : एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या

टीम : ईगल आय मीडिया

आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम शहरात एका व्यक्तीने एकाच कुटुंबातील चक्क सहा जणांची हत्या केली. विशेष म्हणजे यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. आरोपी अप्पलराजू याने सहा जणांची हत्या करुन स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केलं. 2018 मध्ये झालेल्या मुलीच्या बलात्काराचा बदला म्हणून आपण हे कृत्य केल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे .
पोलिसांकडून आरोपीला अटक


दोन्ही कुटुंबांमध्ये शत्रूत्व होतं. मृतक कुटुंबातील एका व्यक्तीने आरोपीच्या मुलीवर बलात्कार केला होता, असा दावा त्याने केला आहे. त्यातून त्याने इक्या लोकांच्या हत्या केल्या, असं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, ज्या व्यक्तीने बलात्कार केला होता तो सध्या फरार आहे.

संबंधित घटना ही विशाखापट्टणम येथील जट्टादा गावात घडली आहे. या गावातील अप्पलराजू या व्यक्तीने एकाच कुटुंबातील सहा जणांचा जीव घेतला. या घटनेनंतर आरोपीने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केलं. आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. आरोपीची सध्या चौकशी सुरु आहे.

आरोपीन 3 महिला, 6 महिन्याचे बाळ, लहान मुलं आणि एका पुरुषाची निर्दयीपणे हत्या केली आहे. त्यांच्या मृतदेहाला ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशत माजली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!