टीम : ईगल आय मीडिया
भारतात कोरोनाचा कहर कायम असून देशातील कोरोना बाधितांची संख्या ४ लाखांच्या उंबरठ्यावर ( ३ लाख ९७ हजार २३ ) येऊन ठेपली आहे. भारतात मागील २४ तासात १४ हजार ५१६ नवीन रुग्ण सापडले आहेत तर ३७५ रुग्णांची जीवन यात्रा कोरोनाने संपवली आहे. देशात आजवर कोरोनामुळे १२ हजार ९७२ नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. त्याचबरोबर तब्बल २ लाख १४ हजार ९४२ रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत.
कोरोनाचा प्रसार भारतात वेगाने सुरु असून सध्या जागतिक पातळीवर सर्वाधिक कोरोना बाधितांच्या यादीत भारताचा ४ था क्रमांक लागतो आहे. तिसऱ्या नंबरवरील रशियामध्ये ५ लाख ७६ हजार रुग्ण आहेत आणि पहिल्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेत २२लाख ९८ हजारांवर रुग्णसंख्या झाली आहे. तर अमेरिकेत १ लाख २१ हजार ४२४ एवढे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.
भारतातकोरोनाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने ३ ८२ दिवसांचा तीनवेळा लॉक डाऊन जाहीर केला तरीही कोरोनाचा प्रसार सुरूच आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश पाठोपाठ आता कोरोनाने मुंबई पाठोपाठ चेन्नई, अहमदाबाद, दिल्ली हि शहरे हॉटस्पॉट बनवली आहेत.
सद्य देशाचे कोरोना बरा होण्याचे प्रमाण ५४ टक्के असून सरासरी मृत्यूचे प्रमाण ३. टक्के इतके कमी आहे. मात्र कोरोनाचे वाढते रुग्ण देशासमोरील मोठे संकट बनले आहे.