भारतात कोरोनावर 3 लसी येणार

3 कंपन्यांनी कोरोना लस वापरण्याची मागितली परवानगी

टीम : ईगल आय मीडिया

देशातील नागरिकांना दिलासादायक वृत्त असून देशातील तीन औषध निर्माण कंपन्यांनी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडे आपातकालीन स्थितीत कोरोना लसीचा वापर करण्याची परवानगी मागीतली आहे. या तिन्ही लसींच्या संदर्भात नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी महत्त्वाची माहिती दिली.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची आज पत्रकार परिषद झाली. या परिषदेत देशातील कोरोना स्थिती आणि त्यावरील लसी संदर्भात माहिती देण्यात आली.

या पत्रकार परिषदेत बोलताना नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. पॉल पुढे म्हणाले, ‘ दिल्लीत निर्माण झालेली करोनाची स्थिती सध्या स्थिर झाली आहे. संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी विषाणूचा पाठलाग केला जात आहे.

“सध्या तीन लसींना परवानगी देण्याची प्रस्ताव विचाराधीन आहे. खूप सक्रियपणे यावर विचार केला जात आहे. तिन्ही लसींना किंवा तिन्हीपैकी एका लसीच्या बाबत लवकरच परवाना दिला जाण्याची आशा आहे,” असं डॉ. पॉल म्हणाले.

Leave a Reply

error: Content is protected !!