दरड कोसळली 11 ठार: 30 जण बेपत्ता

हिमाचल प्रदेशातील दुर्घटना

टीम : ईगल आय मीडिया

हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये महामार्गावर दरड कोसळून भूस्खलनात अनेक गाड्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या आहेत. या घटनेत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. दरम्यान घटनेचे वृत्त समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून माहिती घेतली आहे. इंडो तिबेट पोलीस मदत आणि बचावकार्य करीत आहेत.

हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातल्या रेकांग पियो-शिमला हायवेजवळ दुपारी १२.४५ ही दुर्घटना घडली आहे. या भूस्खलनात एक ट्रक, एक हिमाचल प्रदेश परिवहनची बस आणि इतर वाहनं दबल्याचं सांगण्यात येत आहे. शिमल्याला जात असलेल्या सरकारी बसमध्ये ४० प्रवासी होते. ही बस यात ढिगाऱ्याखाली अडकल्याचं बोललं जात आहे.

या घटनेवरून पंतप्रधान मोदींनी ट्वीट केले आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्याशी आपण किन्नौरमधील भूस्खलनाच्या घटनेसंबंधी फोनवरून बोललो आहोत. मदत आणि बचावकार्यात सर्व मदत केली जाईल, असं आश्वासन पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्याना दिलं आहे. एनडीआरएफच्या टीमलाही अलर्ट करण्यात आलं आहे. या दुर्घटनेची सविस्तर माहिती अद्याप मिळालेली नाही, असं हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर म्हणाले.

Leave a Reply

error: Content is protected !!