जेईई – नीट संदर्भात बोलतील वाटलं, तर ते खेळण्यांवर बोलले


राहूल गांधी यांची मोदींच्या ‘मन की बात’वर टीका

जेईई नीट परीक्षा संदर्भात काँग्रेस आक्रमक

टीमः ईगल आय मीडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात कार्यक्रमांमध्ये रविवारी खेळणी विषयी उल्लेख केला मात्र जेईई -नीट परीक्षेसंदर्भात कोणतेही भाष्य केले नाही. दरम्यान, काँग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला असून विद्यार्थी जेईई- नीट संदर्भात पंतप्रधान बोलतील अशी अपेक्षा होती, मात्र ते मुलांच्या खेळण्यांवर बोलले, असा टोला गांधी यांनी लगावला.


मोदी आणि रविवारी मन की बात बात कार्यक्रमांमध्ये खेळणी उद्योगा संदर्भात माहिती दिली. ग्लोबल इंडस्ट्री सात लाख करोड पेक्षा मोठी आहे. मात्र, त्यामध्ये भारताची गुंतवणूक ही खूप कमी आहे. भारतात नवनवीन कल्पना युवक मांडत असतात, युवकांनी खेळणे बनवण्याच्या, गेम्स बनवण्याच्या क्षेत्राकडे वळायला हवे असेही मोदी म्हणाले. गेम्स आणि खेळणी बनवण्याच्या क्षेत्रामध्ये भारताला महत्त्वाची भूमिका बजावायची आहे.


आपल्या मन की बात कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी जेईई नीट परीक्षा संदर्भात कोणतेही भाष्य केले नाही. या परीक्षा १ सप्टेंबर पासून सुरू होणार आहेत. नीट परीक्षा ही १३ सप्टेंबरला होणार आहे. सध्याची कोरोना महामारीची परिस्थिती लक्षात घेता, विविध राज्यातून याला विरोध होत आहे. यासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आलेली होती. सुप्रीम कोर्टाने या परीक्षा स्थगित करण्यास नकार दिला. त्यानंतरही आता महाराष्ट्र, पश्चिम बंगाल यासह सात राज्यही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात याचिका दाखल करणार आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!