मराठा आरक्षणाला सुप्रीम स्थगिती

नोकरी, शिक्षणात प्रवेश नाही : प्रकरण मोठ्या पीठाकडे वर्ग करण्याचा निर्णय

नवी दिल्ली : ईगल आय मीडिया

बहुप्रतिक्षेत असलेल्या मराठा आरक्षणावरील खटल्याचा निकाल आज, बुधवारी सुप्रीम कोर्टाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने सुनावला आहे. यामध्ये नोकरी व शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा आरक्षण सध्या लागू होणार नाही, असे स्पष्ट करत खंडपीठाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला तूर्त स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर या खटल्याची सुनावणी मोठ्या खंठपीठासमोर करण्याचा निर्णयही दिला आहे.

न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव आणि न्यायमूर्ती एस. रवींद्र भट यांच्या तीन सदस्यीय खंठपीठासमोर मराठा आरक्षणासंदर्भात दाखल याचिकांवर सुनावणी सुरू होती.

या प्रकरणाची सुनावणी मोठ्या खंठपीठासमोर घेण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली होती. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने आरक्षणाला स्थगिती देण्याची मागणीही करण्यात आली होती. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी मोठ्या खंठपीठाकडे घेण्याचा निर्णय आज झालेल्या सुनावणी दरम्यान घेतला. त्याचबरोबर मराठा आरक्षण नोकरी आणि शैक्षणिक प्रवेशासाठी सध्या लागू करता येणार नाही. मात्र, अगोदर देण्यात आलेल्या पदव्युत्तर प्रवेशांमध्ये बदल करण्यात येऊ नये, असा महत्त्वाचा निर्णय न्यायालयाने दिला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!