40 फूट खोल विहिरीत 40 जण पडले

बचाव कार्य सुरू : 3 जनांचे मृतदेह काढले

रात्रभर बचावकार्य सुरू आहे.

टीम : ईगल आय मीडिया

मध्य प्रदेशमधील विदिशा जिल्ह्यामध्ये एका विचित्र अपघातात 40 पडल्याची दुर्घटना घडली असून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर गंभीर व किरकोळ जखमी झालेल्या १९ जणांची सुखरुप सुटका करण्यात आलीय. यासंदर्भातील माहिती जिल्ह्याचे पालक मंत्री विश्वास सारंग यांनी एएनआयशी बोलताना दिली आहे.

गुरुवारी सायंकाळी विदिशा जिल्ह्याच्या गंजबासौदा भागातील लाल पठार परिसरामध्ये एका विहिरीमध्ये 8 वर्षीय मुलगी पडल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. मात्र, त्यापाठोपाठ त्या मुलीस वाचवण्यासाठी आणि ते ‘बचावकार्य’ बघण्यासाठी शेकडोंच्या संख्येनं या विहिरीभोवती गर्दी झाली. आणि त्यावेळी विहिरीचा कठडा कोसळून 40 जण विहिरीत पडले.


विहिरीच्या भोवती बघ्यांची गर्दी एवढी वाढली की तिथेच चेंगराचेंगरी होण्याची परिस्थिती निर्माण झाली. विहिरीभोवती बांधण्यात आलेल्या कठड्यावरून वाकून वाकून सर्व लोक विहिरीत पडलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी सुरू असलेला प्रयत्न बघत होते. मात्र, हा भार विहिरीच्या कठड्याला पेलवला नाही आणि अचानक कठडा खचला. कठडाच मोडून पडल्यानंतर त्याला रेलून उभे असलेले किमान 40 जण एकाच वेळी विहिरीत पडले.

सध्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या तुकड्या आणि राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या तुकड्यांकडून येथे मदतकार्य सुरु आहे. पालकमंत्री सारंग स्वत: या ठिकाणी रात्रीपासून उपस्थित असून मदतकार्यावर लक्ष ठेऊन आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीच या प्रकरणामध्ये सर्व खबरदारी घेण्याची सूचना रात्रीच संबंधित अधिकारी आणि मंत्र्यांना केलीय.


या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी तातडीने डीजीपी, एसडीआरएप, आयजी यांना घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले. तसेच, आपण स्वत: बचावकार्यावर लक्ष ठेऊन आहोत, असं देखील चौहान यांनी स्पष्ट केलं आहे. रात्रीच्या अंधारात बचाव कार्य करण्यात अनेक अडचणींचा सामना बचाव पथकाला करावा लागला.

Leave a Reply

error: Content is protected !!