भाजपने लाईक , डीस लाईक ऑप्शनच बंद केला
Like पेक्षा dis like जास्त दिसत आहेत
टीम : ईगल आय मीडिया
भाषण आणि पाऊस म्हटलं की महाराष्ट्रच नाही तर देशभरात शरद पवार आठवतात, तसेच आता भाषण आणि डीस लाईक म्हंटल की लोकांना मोदी आणि डीस लाईक आठवले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण सोशल मीडियावर आले रे आले की डीस लाईक चा पाऊस सुरू होतो आणि मग भाजपाला तो ऑप्शन बंद करण्याची छत्री उघडावी लागते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावं आणि देशाने जीव कानात गोळा करून ते ऐकावं असे ही दिवस होते. मोदींच्या सभा,मोदींची भाषणे, त्यांचे विविध इव्हेंट्स आणि देशवासियांना कामाला लावणे म्हणजे अगदी उत्सव असायचा. मात्र आता वातावरण बदलत आहे. मोदींच्या भाषणाला लोक कंटाळले आहेत की काय अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.
कारण मोदींच्या भाषणाचा trp घसरतो आहे. फेसबुक, you tube, ट्विटर अशा सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर मोदींच्या भाषणाला like कमी, डीस लाईक दुप्पट, तिप्पट संख्येने येऊ लागल्या आहेत.मंगळवारी मोदींनी देशाला उद्देशून भाषण केले. मात्र भाषण सुरू होताच पहिल्या काही मिनिटांत च डीस लाईक like च्या तुलनेत दुपटीहून अधिक झाल्या. हे पाहून मग भाजपने अब्रू वाचवण्यासाठी like आणि डीस लाईक चा ऑप्शनच बंद केला.
ज्या सोशल मीडियाच्या प्रभावाने भाजप सत्तेत आली त्याच सोशल मीडियावर मिळणाऱ्या नकारार्थी प्रतिक्रिया भाजपला असह्य होत असल्याचे दिसून येते.