डासानी उडवली मुख्यमंत्र्यांची झोप !

अभियंता झाला सस्पेंड : मध्य प्रदेशातील अजब प्रसंग

टीम : ईगल आय मीडिया

मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना सिधी शासकीय विश्रामगृहात डासानी हैराण करून सोडले, त्यामुळे संतप्त झालेल्या मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्याची झाडाझडती तर घेतलीच, सिधी बांधकाम विभागाच्या उप अभियंत्यास निलंबित ही केले. त्यामुळे त्या अधिकाऱ्यावर ‘ साला एक मच्छर ऑफिसर को सस्पेंड कर देता है!’ असं पालुपद गाण्याची वेळ आली आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान मध्य प्रदेशच्या सिद्धी या परिसरात १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या भीषण बस दुर्घटनेच्या अपघातस्थळाची पाहणी करण्यासाठी ते आले होते. दौरा आटोपल्यानंतर शिवराजसिंह चौहान संध्याकाळी सिधीमधल्या सर्किट हाऊसवर मुक्कामी थांबले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांना डासानी हैराण करून सोडले. या ठिकाणी मच्छरदाणी ची सोय नव्हती की मोस्कीटो क्वाईल सुद्धा नव्हती. मुख्यमंत्र्यांनी तक्रार केल्यानंतर पहाटे 2 वाजता विश्रामगृहात स्प्रे फवारणी करण्यात आली.

आसपास मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता असल्यामुळे सर्किट हाऊसमध्ये मोठ्या प्रमाणावर डासांचा वावर होता. डास चावत असल्यामुळे मुख्ममंत्री शिवराजसिंह चौहान यांना झोपच लागेना. मुख्यमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांना पाचारण करून त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.

डास मारण्याचं औषध खोलीत मारून झाल्यानंतर ते पुन्हा झोपले. जरा डोळा लागला असतानाच सर्किट हाऊसच्या वरची पाण्याची टाकी ओव्हरफ्लो झाली आणि मोठा आवाज करत पाणी खाली पडू लागलं. पुन्हा मुख्यमंत्र्यांची झोप मोडली. शेवटी मुख्यमंत्री स्वत:च टाकीची मोटार बंद करण्यासाठी उठले.

शेवटी झोप न झालेल्या अवस्थेत शिवराज सिंह चौहान भोपाळला परतले. विभागीय आयुक्तांनी दुसऱ्याच दिवशी संबंधित उप अभियंता बाबूलाल गुप्ताला निलंबित केले. तसेच, जिल्हाधिकाऱ्यांकडून देखील खुलासा मागवण्यात आला

Leave a Reply

error: Content is protected !!