पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला
टीम : ईगल आय मिडीया
कन्याकुमारी (तामिळनाडू) येथील काँग्रेस खासदार एच वसंत कुमार (७०) यांचे कोरोनामुळे २८ ऑगस्ट रोजी निधन झाले. १० ऑगस्टपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. २० मार्च रोजी संसद अधिवेशनात त्यांनी कोरोनाला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची तसेच गरजूंना मदत करण्याची मागणी केली होती.
एच. वसंत कुमार यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
त्यांनी केलेल्या शेवटच्या भाषणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. एच. वसंत कुमार हे राजकारणाबरोबरच उद्योग-व्यवसायात ही सक्रिय होते. एक सेल्समन म्हणून त्यांनी सुरुवात केली होती, नंतरच्या काळात ते व्यवसायिक म्हणून पुढे आले होते.
तमिळनाडू काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणूनही ते काम पाहत होते. खासदार होण्यापूर्वी ते नांगुनेरी विधानसभा क्षेत्रातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.