तामिळनाडू मध्ये 5 दिवसांत 3 विद्यार्थ्यांनी मृत्यूस कवटाळले
टीम : ईगल आय मीडिया
Neet ही परीक्षा पास होणार नाही या भीतीने तामिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यातील 17 वर्षीय विद्यार्थिनी ने सोमवारी – मंगळवारी मध्यरात्री आत्महत्या केली आहे. Neet च्या भीतीने गेल्या 5 दिवसांत तामिळनाडू मध्ये झालेली ही विद्यार्थ्यांची तिसरी आत्महत्या आहे. विशेष म्हणजे तामिळनाडू सरकारने मंगळवारी राज्यातील विद्यार्थ्यांना NEET मधून सूट देणारे विधेयक मंजूर केले होते.
आत्महत्या करणारी 17 वर्षीय कनिमोझी ही विद्यार्थीनी उदयर्पालयम अंतर्गत थुलरनकुरीची गावातील रहिवासी आहे. तिला 600 पैकी 562.28 गुण मिळवून 12 वीत जिल्हा टॉपर घोषित करण्यात आले. पीडित मुलीचे पालक व्यवसायाने वकील आहेत.
अरियालूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी रविवारी तंजावूर येथील शाळेत NEET परीक्षेला बसली होती. “तिच्या पालकांनी आम्हाला सांगितले की ती परीक्षेत चांगली कामगिरी करत नसल्याने ती नाराज होती,” पोलिसांनी सांगितले.
सोमवारी, अरियालूर जिल्ह्यातील साठमपाडी गावातील 17 वर्षीय कनिमोझी या विद्यार्थिनीने आपले जीवन संपवले. NEET च्या एक दिवस आधी शनिवार, 11 सप्टेंबर रोजी, सालेम येथील 20 वर्षीय तरुण धनुषने परीक्षेत अनुत्तीर्ण होण्याच्या भीतीने आत्महत्या केली. तर तामिळनाडूच्या वेल्लोर जिल्ह्यातील काटपाडीजवळील थैयारामपट्टू गावातील सौंदर्या टी. नावाच्या विद्यार्थ्यानीने आज, राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा (NEET) परीक्षा नापास होण्याच्या भीतीने आत्महत्या केली.
उदयर्पालयम पोलीस ठाण्याच्या एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना मंगळवारी सकाळी मुलीने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. ” तिच्या घरातून कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही. तिने तिच्या घरी गळफास लावून घेतला, भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलमांखाली अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा नोंदवला आहे.
रविवारी, NEET परीक्षेच्या काही तास आधी, 19 वर्षीय धनुष राज्यातील सालेम जिल्ह्यातील मेट्टूरमध्ये त्याच्या खोलीच्या छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला. सालेम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनुष तिसऱ्यांदा (NEET) परीक्षेला बसणार होता.
धनुषच्या आत्महत्येमुळे राज्यात NEET परीक्षेला स्थगिती मिळावी या मागणीसाठी व्यापक आंदोलन झाले होते. तामिळनाडू विधानसभेने सोमवारी 12 वी बोर्डाच्या गुणांवर आधारित वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी विधेयक मंजुुुर केेेले. त्या नंतर ही दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.