8 हजार 458 कोटी रुपये मोदींच्या नवीन विमानाची किंमत

तासाला उड्डाण खर्च 1 कोटी 30 लाख

टीम : ईगल आय मीडिया

जगाची महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षांच्या बरोबरीचा दिमाख असलेले नवे विमान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिमतीला असेल. तब्बल 8 हजार 458 कोटी रुपये किंमत असलेल्या या विमानाचा उड्डाण खर्च तासाला केवळ 1 कोटी 30 लाख रुपये आहे. हे विमान आज भारतात येणार असून हवाई दल या विमानाची देखभाल करणार आहे. पंतप्रधान यांच्याशिवाय हे विमान राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांनाही वापरता येणार आहे.
बोइंग-७७७ ने (Air India One) ही दोन नवी सुपर व्हीआयपी विमानाला हवाईदल हाताळणार आहे. या विमानाचे कॉल साइन एअरफोर्स वन असे ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ताशी ९०० किमी चा वेग आणि
1 कोटी 30 लाखांचा खर्च
या विमानाच्या उड्डाणादरम्यान ताशी १,८१,००० डॉलर (सुमारे १ कोटी ३० लाख रुपये) इतका खर्च येतो. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवे विमान ताशी ९०० किमीच्या वेगाने उड्डाण करणार आहे. या विमानात हवेत इंधन भरण्याची देखील क्षमता आहे.

या विमानात तीन प्रकारच्या रंगांचा वापर करण्यात आला आहे. बोइंग-७७७ मध्ये पांढरा, फिकट निळा आणि नारंगी रंगाचा वापर करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. फिकट निळा रंग आणि पांढरा रंगाचा वापर सर्वाधिक करण्यात आला आहे. तर नारंगी रंगाने विमानालच्या मध्यमागी रेषा ओढण्यात आली आहे.

या विमानाची किंमत ८,४५८ कोटी रुपये इतकी आहे. अतिशय सुरक्षित समजले जाणाऱ्या या विमानाच्या दुसऱ्या भागात जॅमर बसवण्यात आले आहे. यामुळे शत्रूंच्या रडारचे सिग्नल जॅम होतात. या विमानावर क्षेपणास्त्र हल्ल्याचा देखील परिणाम होत नाही. या विमानात हवेत इंधन भरण्याची देखील क्षमता आहे. हे विमान अमेरिके ते भारत असा सलग प्रवास करू शकते.

Leave a Reply

error: Content is protected !!